breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर! बळीराजाला मिळणार दिलासा, पण वर्षभर कोरोनाचा संकट राहणार कायम

बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अखेर आज ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. भेंडवळच्या भविष्यवणीनुसार राज्यात यंदा चांगला पाऊस पडणार आहे. मात्र देशावर आलेलं महामारीचं संकट यावर्षीही कायम राहणार हवं.

भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्याप्रमाणावर असून देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.

काय सांगितलं भविष्यवणीत?

जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल
ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होईल
विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे.
तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव मिळणार नाही.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.
देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.
पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.
राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या राजाची गादी कायम राहणार
राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button