breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीत 69 शाळांचा निकाल शंभर टक्के; तर शहराचा 94.33 टक्के

पिंपरी – राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा 94.33 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 1 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. तर, शहरातील 69 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

पिंपरी-चिंचवडचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा एक टक्क्यांनी वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमधील एकूण 17 हजार 782 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील 16 हजार 774 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, 1008 विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. 70 टक्क्यांपेक्षा अधिक गूण सहा हजार 68 विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. प्रथमश्रेणीत पाच हजार 938 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, शहरातील 69 शाळांचा निकास शंभर टक्के लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button