breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नोव्हेंबरपर्यंत १ लाख शासकीय पदे कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार

मुंबई : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा धडाका लावला आहे. सरकारकडून सेवापुरवठादार संस्थांची निवड करून बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पर्यंत सरकारने ४ विभागांतील ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात कंत्राटी पद्धतीने १ लाख पदे भरण्याचा विचार सरकार करत आहे.

हेही वाचा – सप्तर्षी फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य शिबिर व सॉफ्टवेरचे सादरीकरण संपन्न 

नोव्हेंबर महिन्यामध्ये १ लाख पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जलसंपदा विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग अशा इतर सर्व विभागांचा समावेश असणार आहे. त्यानुसार गृह व नियोजन विभागामध्ये ५ हजार पदे, जलसंपदा विभागामध्ये ८ हजार पदे, आदिवासी विभागामध्ये २ हजार पदे, ग्रामविकास विभागात ५ हजारांवर पदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये ६ हजार पदे, कृषी विभागामध्ये ३ हजार पदे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामध्ये ५ हजार पदे, वन विभागामध्ये ५ हजार पदे, शालेय शिक्षण विभागात ६ हजार पदे, अशा सर्व विभागांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी नोकरदारांची भरती करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button