Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा?

मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FASTag Annual Pass आता महाग होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे. आधी हा पास 3000 रुपयांना मिळायचा. 1 एप्रिल पासून हा पास 3,075 रुपयांना मिळणार आहे. या निर्णयामुळे FASTag Annual Pass ने महाग झाला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

हेही वाचा –  आयटीआयमध्ये 25 ते 35 टक्के जागा रिक्त; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

काय मिळतं या पासमध्ये?

-FASTag Annual Pass हा प्रामुख्यानं खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) लागू आहे.

या पासमध्ये:

-1 वर्षाची वैधता किंवा 200 टोल प्रवास (जे आधी पूर्ण होईल) अशी सुविधा मिळते.

-यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक सोपा आणि जलद होतो.

कसा घ्यायचा पास?

-हा पास ऑनलाइन सहज उपलब्ध आहे.

-‘Rajmarg Yatra’ अ‍ॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.

-FASTag ID आणि वाहन क्रमांक टाकावा लागतो.

-UPI / कार्ड / नेट बँकिंगद्वारे पेमेंट करता येतं.

-पेमेंटनंतर काही तासांत पास अ‍ॅक्टिव्ह होतो.

दरवाढ का?

या दरवाढीमागे ऑपरेशन आणि देखभाल खर्च वाढ हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रवास महागणार

FASTag Annual Pass हा अनेक नियमित प्रवाशांसाठी फायदेशीर पर्याय होता. मात्र आता दरवाढीनंतर राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाचा खर्च थोडाफार वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button