ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंपनीच्या आवारात राहत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

पिंपरी चिंचवड | कंपनीच्या आवारात राहत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 21 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे एमआयडीसी भोसरी मधील संदीप हायटेक या कंपनीत उघडकीस आली.

राज इकबाल शेख (वय 18, रा. संदीप हायटेक, एमआयडीसी भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज शेख हे संदीप हायटेक या कंपनीच्या आवारात असलेल्या सिक्युरिटी गार्डच्या रूममध्ये राहतात. मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी पहाटे चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीच्या गेटवरून अथवा भिंतीवरून उडी मारून कंपनीच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी राहत असलेल्या रूमचा दरवाजा उघडून फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button