breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई | अत्यावशक सेवा असणाऱ्या बेस्टमधील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्याला खोकला आणि सर्दीचा त्रास होता. यामुळे त्याने कोरोनाची चाचणी करून घेतली. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. संबंधित कर्मचाऱ्याने आज बेस्ट प्रशासनाला ही माहिती दिली.

तर बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तीला कोरोना झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यालाही इतर नातेवाईकांसोबत क्वांरटाईन करण्यात आले आहे. कालच एका बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. टिळकनगर येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला होता. हा कर्मचारी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात काम करत होता. त्याला मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button