breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

‘भाजप १२५-१३० जागा जिंकणार’; माजी मुख्यमंत्र्याचा दावा

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची धाम धूम सुरू झाली असून अनेक वरिष्ठ नेते भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात पकडत आहेत. यामुळे भाजपला ही निवडणुक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

बीएस येडियुरप्पा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा हुबळी-धारवाड जागेवर कडवी झुंज द्यावी लागेल आणि यात त्यांचा पराभव होईल.

किमान ८० महत्वाच्या विधानसभा जागांना भेट देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी आम्ही एका दिवसांत चार जागांचं लक्ष्य ठेवलंय. मी राज्यभर दौरा केला आहे आणि मला खात्री आहे की भाजप २२४ सदस्यांच्या विधानसभेत १२५-१३० जागा जिंकून कर्नाटकमध्ये सत्तेत परत येईल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केला आहे.

जगदीश शेट्टर यांना त्यांच्या पत्नीला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. अमित शाह यांनी वैयक्तिकरित्या त्यांना फोन करून राज्यसभा सदस्य आणि नंतर केंद्रीय मंत्री होण्यास सांगितलं. त्यांनी याला नकार दिला. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असंही बीएस येडियुरप्पा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button