breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराजकारणराष्ट्रिय

UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलणं अशक्य; केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएसी पूर्व परीक्षा पुढं ढकलणं अशक्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी यूपीएसी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वाच्च न्यायालयात दाखल केलेली होती. परंतु, आता आयोगाने परीक्षा घेण्यासंदर्भातील आपली भूमिका मांडताना पूर्व परीक्षा पुढे ढकलणं अशक्य असल्याचं म्हटलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील शाळा तसेच महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलेली होती. याशिवाय महाविद्यालयीन परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या.

यावेळी यूपीएसीच्या परीक्षादेखील लांबणीवर टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र, आता आयोगाने यूपीएसीच्या परीक्षासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, येत्या 4 ऑक्टोबर रोजी यूपीएसीची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांकडून यूपीएसीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वाच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झालेली आहे. यावेळी केंद्रीय लोकसेवा आरोगाने आपली बाजून मांडताना सांगितलं की, पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणं अशक्य आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला परीक्षा घेण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button