breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#Breaking: हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारची परवानगी

मुंबई |

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी अशणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. ज्यामधअये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत, त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे, त्याबाबत मी सांगतो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तिंना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. त्यामध्ये त्याचं स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचं प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखवलं तर, मासिक आणि त्रैमासिक पासेस देण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये ५० टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा १०० या पेक्षा जास्त नाही. शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी बँक कर्मचारी रेल्वे या सगळ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे आणि असंही सांगितलं आहे की, खासगी औद्योगिक व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचे ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button