breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील गाडलेल्या ४ लेणी समुहांचा शोध

नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील पाडळी येथील डोंगररांगांत नवीन ४ लेणी समुहांचा शोध लागल्याची माहिती माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी दिली.असून हे चारही लेणी समूह संपुर्ण मातीत गाडलेले असल्यामुळे त्या गाडलेल्या ढिगा-यांखाली किती लेणी असतील याचा अंदाज बांधता येणे मात्र अवघडच आहे. तसा फक्त अनुमान जर लावलाच तर कमीत कमीत १० ते १५ लेणी तरी उत्खननानंतर जगासमोर येतील असा अंदाज येतो. काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी अगदी पाचच्या आसपास लेणी समुहांचा तेथील कातळकोरीव कडे पाहून अंदाज येतो. पैकी एक लेणी समुहात शिवलिंग कोरलेले असून ते केंव्हापासून असावे याचा अंदाज बांधता येत नाही. कातळ कोरीव कलेतून हा संपूर्ण बौध्दकालिन वारसा असावा असे वाटते. २०१५ साली या शिवलिंग असलेल्या लेणीस खरमाळे यांनी प्रथमभेट दिली होती. यानंतर याच डोंगर रांगेवर जसजसा वेळ मिळत गेला तसं तसा तेथील शोध घेत गेले. आजुन पण खूप काही येथे दडलेले उजेडात येऊ शकते व जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसेत व जागतीक लेणी समुहांच्या संख्येत भर पडू शकते असे ही त्यांनी सांगितले
हे ४ लेणी समुह जर उत्खनन करून संवर्धीत केले गेले तर येणाऱ्या काळात पाडळी गावच्या ऐतिहासिक वारसेत खुप मोठी भर तर पडेलच परंतु जुन्नर तालुक्याच्या नावलौकिकास पण चार चांद निश्चितच लागतील.
जुन्नर तालुका पर्यटन विकासासाठी सदैव तत्पर असलेली किल्ले संवर्धन संस्था शिवाजी ट्रेलचे विश्वस्थ व मार्गदर्शक विनायक खोत व शिवाजी ट्रेलच्या हिस्ट्री क्लबचे अध्यक्ष विजय कोल्हे यांचे या शोध मोहिमेत मोलाचे योगदान मिळाले असल्याचे खरमाळे यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button