Breaking-newsराष्ट्रिय

भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 20-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं.

याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झडापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.
सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे.

दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button