Breaking-newsराष्ट्रिय

टाटा, लतादीदी, माधुरी यांचीही अमित शहा घेणार भेट

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या (बुधवार) मुंबई दौऱ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेणार आहेत. ते उद्योगपती रतन टाटा, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेणार असल्याचे समजते. मोदी सरकारने चार वर्षांचा कार्यकाळ पूूर्ण केल्यानिमित्त भाजपने समर्थनासाठी संपर्क या नावाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या अभियनांतर्गत पक्षाचे 4 हजार पदाधिकारी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एक लाख मान्यवरांशी संपर्क साधणार आहेत. स्वत: शहा 50 मान्यवरांची भेट घेणार आहेत. या भेटीगाठींवेळी मोदी सरकारची कामगिरी मान्यवरांसमोर मांडली जाईल. शहा यांनी याआधी माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग, योग गुरू रामदेवबाबा, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आदींची भेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button