Breaking-newsराष्ट्रिय
काँग्रेसचा बेरोजगारांना भत्ता, तर भाजपची विद्यार्थीनींना ‘इलेक्ट्रिक स्कूटर’
नवी दिल्ली | महाईन्यूज | ऑनलाईन टिम
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या फैरी झडू लागल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आश्वसने देऊन मतदारांचा विश्वास संपादन केला जात आहे. त्यात कॉंग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पदवीधर तरुणांना बोरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले आहे. तर, भाजपाने गरीब कॉलेज तरुणींना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जे पदवीधर बेरोजगार आहेत त्यांना प्रतिमहिना ५,००० रुपये तर जे पदव्युत्तर बेरोजगार आहेत त्यांना प्रतिमहिना ७,५०० रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे वचन दिले आहे.





