Breaking-news

कर्नाटकात भाजप सत्ता स्थापन करणार की काँग्रेस गड राखणार?

बंगळूरू : कर्नाटक निवडणुकीचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये गड राखणे पक्षाला कठीण जाईल असेच चित्र दिसत आहे. अनेक जनमत चाचण्यांनुसार कर्नाटक विधानसभा त्रिशंकू राहण्याची शक्यता चिन्ह दिसत आहे. त्यामुळे निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्नाटकात दाखल झाले असून सत्तेच्या जुळवाजुळवीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

मात्र, भाजपाने गोव्यासारखीच खेळी कर्नाटकात केली तर कर्नाटक हे भाजपची थेट किंवा युतीच्या माध्यमातून सत्ता असणारे २२वे राज्य ठरेल. कर्नाटकात काँग्रेसला फटका बसला तर एकेकाळी २६ पैकी १६ राज्यांमध्ये सत्ता असणारा काँग्रेस पक्ष केवळ दोन राज्यांमध्ये सत्तेत राहिल. काँग्रेसकडे सध्या केवळ कर्नाटक, मिझोरम आणि नुकताच विजय मिळवलेले पंजाब अशी तीनच राज्ये राहिली आहेत. त्याचबरोबर पाँडिचेरीमध्येही काँग्रेसची सत्ता आहे. मागील चार वर्षांमध्ये १३ पैकी १० राज्यामधील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button