Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यावर पुन्हा घोंगावतयं संकट! मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

IMD warn for Shakti cyclone : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यातच आता राज्यावर पुन्हा संकट घोंगावतयं कारण आता हवामान विभागाने मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला आहे.

यामध्ये हवामान विभागाने शक्ती चक्रीवादळाचा इशारा देत मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यामध्ये 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस, ताशी 45-65 किमी वेगाने वादळी वारे वाहतील समुद्रात लाटा उसळतील वाऱ्याचा वेग आणखी देखील वाढू शकतो.

हेही वाचा –  ‘सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

या पार्श्वभूमीवर आयएमडीने समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये मदत पथकांना सावद राहून मदतीस सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दरम्यान मराठावाडा आणि पुर्व विदर्भात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात 29 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button