Breaking-news

कर्नाटकात उद्याच ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल : अभिषेक मनू सिंघवी

नवी दिल्ली : कर्नाटकात उद्या दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, असे म्हणत उद्या शनिवारी काँग्रेस-जेडीएस बहुमत सिद्ध करेल असा विश्वास काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता भाजपला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागेल आणि तोपर्यंत येडियुरप्पा यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असेही सिंघवी यांनी स्पष्ट केले आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीचे पूर्ण निकाल जाहीर होण्याच्या आधीच भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा राज्यपालांकडे सादर केला, असा युक्तीवादही अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

भाजपच्या येडियुरप्पांना उद्या दुपारी 4 वाजता विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे लागेल, तसेच दुपारी 4 वाजण्याआधी सर्व आमदारांचा शपथविधीही पार पडणार आहे. या बहुमत चाचणीत दूध का दूध और पानी का पानी होईल असा विश्वास काँग्रेस-जेडीएसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button