Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लाडकी बहीणनंतर आता “लाडकी सून” अभियान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई | विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. अल्पावधीतच ही योजना राज्यभर गाजली. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी “लाडकी सून अभियान” सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात या अभियानाची सुरुवात केली. आजपासून आपण नवीन अभियान सुरू करत आहोत. ते लाडक्या सुनेंसाठी महत्त्वाचे आहे. सासर काही वाईट नसते, पण काही मोजक्या ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी व्हावी, यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा      :      प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू; सरन्यायाधीश भूषण गवई

ज्या सुनांना अडचण येईल, त्यांनी न घाबरता या क्रमांकावर फोन करावा. त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. लाडकी सून अभियानामार्फत पीडित सूनेला सुरक्षा दिली जाईल. ज्या सूना आहेत, त्याही माझ्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथ शिंदे त्यांचा भाऊ आहे. कुणीही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करेल, त्याची गाठ शिवसेनेशी आहे, हे मी सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button