Breaking-newsराष्ट्रिय
कन्हैयाकुमारविरुद्धच्या आरोपपत्रावर न्यायालय १९ जानेवारीला विचार करणार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैयाकुमार आणि अन्य यांच्याविरुद्धच्या देशद्रोहाच्या खटल्यामध्ये आरोपपत्र ठेवण्यात आले त्यावर विचार करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने १९ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.
मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत हे मंगळवारी रजेवर असल्याने न्यायालयाने ही तारीख निश्चित केली. दिल्ली पोलिसांनी सोमवारी कन्हैयाकुमार आणि अन्य यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. जेएनयूच्या संकुलात फेब्रुवारी २०१६ मध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्याला कन्हैयाकुमार याने चिथावणी दिली आणि आंदोलनाचे नेतृत्व केले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.





