ऐतिहासिक घोडदौड! देऊन बंद २ चित्रपटानं १९ दिवसात कमावला ७० कोटी रूपयांचा गल्ला

Deol band 2 Collection: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता दुसरा मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २’ याने देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. देऊळ बंद २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९ दिवसात तब्बल ७० कोटी रूपयांचा गल्ला कमावला आहे. कोणत्याही मोठ्या प्रोडक्शन किवा कॉर्पोरेट प्रोडक्शन बॅनर नसताना मराठी चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर सध्या मोठ्या बॅनरचे हिंदी चित्रपट संघर्ष करत असताना देऊळ बंद २ या चित्रपटाने दिवसेंदिवस कमाईचा धडाका सुरू केला आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने ३० कोटींचा टप्पा पार केला होता. दुसऱ्या आठड्यात देखील या चित्रपटाने २२. ४ कोटी रूपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाची एकूण कमाई ही ६६ कोटींच्या पार पोहचली होती. आता १९ दिवसांनंतर हा आकडा ७० कोटींच्या पार गेला आहे.
हेही वाचा – पुणे महापालिका तातडीने रिकामी करा; महापौर कार्यालय उडवून देण्याच्या धमकीने खळबळ
देऊळ बंद २ चित्रपटाची ही ऐतिहासिक घोडदौड अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करू शकले अशी शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटाला तगडी स्टारकास्ट देखील लाभली आहे. तसेच प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
देऊळ बंद २ चित्रपटाचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत झाला आहे. हा चित्रपट आधीच टॉप ५ मध्ये पोहचला होता. त्यांच्या रडारवर रितेश देशमुखचा वेड हा चित्रपट होता. जर देऊळ बंद २ ने शंभर कोटींचा टप्पा पार केला तर राजा शिवाजी, सैराटनंतर शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा तो तिसरा मराठी चित्रपट ठरणार आहे.





