Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

लग्नकार्य, मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची चिंता मिटली… PF चा पैसा काढणे अजून सोपे… जाणून घ्या प्रक्रिया आणि नियम

EPFO PF Partial Withdrawal: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO) कात टाकत आहे. लवकरच सदस्यांना युपीआय आणि एटीएम कार्डद्वारे पीएफची रक्कम काढण्याची सुविधा मिळले. तर आता लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अजून सोपी झाली आहे. सदस्य आता ऑनलाईन UAN पोर्टलच्या माध्यमातून आगाऊ रक्कम काढू शकतात. याविषयीचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यात EPFO ने सदस्य कोणत्या पद्धतीने PF खात्यातून रक्कम काढू शकतात याची माहिती दिली आहे. जाणून घ्या नियम आणि अटी?

या व्हिडिओनुसार, EPF सदस्य कुटुंबातील सदस्य, ज्यात मुलगा, मुलगी, भाऊ अथवा बहीण यांच्या लग्नासाठी PF ची रक्कम काढू शकतात. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी या सुविधेचा लाभ घेता येतो. पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. नियमांचे पालन ईपीएफओ सदस्यांना करावे लागेल.

हेही वाचा –  भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार, पहिली मॅच केव्हा?

पीएफ रक्कम काढण्याची पद्धत

  1. व्हिडिओनुसार, पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी झाली आहे. कर्मचाऱ्यांना सर्वात अगोदर EPFO च्या UAN पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर “Manage” या भागात जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही ते तपासावे लागेल. यामध्ये आधार, PAN आणि बँक खात्याची लिंक एकदा तपासा. नाहीतर क्लेम नाकारल्या जाऊ शकतो.
  2. यानंतर युझर्सला Online Services मध्ये जाऊन Claim (Form 31, 19, 10C) हा पर्याय निवडावा लागला. येथे बँक खात्याचा पडताळा करावा लागेल. त्यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
  3. या व्हिडिओनुसार, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि अंशतः पैसे (Partial Withdrawal) काढायचे असतील. तर तुम्हाला Form 31 (PF Advance) निवडावे लागेल. त्यानंतर पैसे कशासाठी काढायचा याचे कारण (Reason) द्यावे लागेल. त्यात लग्न (Marriage) वा शिक्षण (Education) हा पर्याय निवडता येईल.
  4. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम काढायची, ते नमूद करावे लागेल. लग्न वा शिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना PF खात्यातील एक रक्कम काढता येते. ही रक्कम 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यासाठी मात्र किमान सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  5. क्लेम केल्यानंतर, रक्कम काढण्याचा दावा केल्यानंतर डिक्लेरेशन स्वीकारावे लागेल. त्यानंतर आधारशी संबंधित मोबाईल क्रमांकावर एक ओटीपीसी येईल. हा ओटीपी सबमिट केल्यावर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एक रेफरन्स क्रमांक मिळेल. त्याआधारे तुम्ही क्लेम स्टेट्‍स ट्रॅक करू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button