Breaking-news

आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर चर्चा करण्यासाठी गुज्जर महापंचायत

जयपुर – राजस्थानातील गुज्जर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापंचायत आयोजित करण्यात आली होती त्यात सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते. या समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या विषयावर सरकारशी केलेल्या चर्चेबद्दल माहिती देण्यासाठी ही महापंचायत बोलावण्यात आली होती.

ओबीसी कोट्यातून या समाजाला पाच टक्‍के आरक्षण मिळावे अशी या समाजाची मागणी आहे. या मागणीबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी गुज्जर समाज प्रतिनिधींशी चर्चा केली. ती अत्यंत विधायक स्वरूपाची झाली असे राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गुज्जर समाजाचे नेते किरोरीसिंग बैंसला यांनी या महापंचायतीत सरकारशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती देऊन सांगितले की या मागणीसाठी सरकारबरोबर चर्चा झाली असली तरी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आपल्याला आंदोलनाला तयार राहावे लागेल. या महापंचायतीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button