Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य; शत्रुघ्न काटे

पंतप्रधान मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' ते 'विकसित भारत' अशा यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळाचा मांडला आढावा

पिंपरी | गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षमतेसह कार्य केले आहे. पूर्वीच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाला प्राधान्य देण्यात आले. ‘शासन म्हणजे सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले गेले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीमुळे करप्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो ऐतिहासिक निर्णय ठरला, असे गौरवोद्वार भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मोरवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या परिषदेत सरकारच्या ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित विविध योजना, महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ‘आत्मनिर्भर भारत’ ते ‘विकसित भारत’ अशा दूरदृष्टीच्या संकल्पाकडून भारताने सिद्धीकडे यशस्वी वाटचाल केली असून, या ११ वर्षांतील अभूतपूर्व कार्यक्षमतेवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

हेही वाचा     :    संवेदनशील आमदारांचा पुढाकार; उपचारासाठी मदत मिळाल्याने रुग्णाला जीवनदान! 

यावेळी, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजपा भटके-विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी पांडेय, अमेय देशपांडे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव योगदान दिले आहे. रेल्वेसाठी तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. मागील यूपीए सरकारने १० वर्षांत दिलेल्या एकूण निधीपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने केवळ एका वर्षात महाराष्ट्राला दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात राज्यात ६ लाख कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत. ‘प्रत्येकाला घर’ देण्याच्या संकल्पाकडे वाटचाल करत या सरकारने ३० लाख घरे देण्याचा विक्रम केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जे गेली ४० वर्षांपासून रखडले होते, ते मोदी सरकारच्या काळात मार्गी लागले आणि आता पूर्णत्वाकडे जात आहेत.

गरीब कल्याण हे मोदी सरकारच्या धोरणांचे केंद्रबिंदू राहिले आहे. ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत १५ कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळून लाखो गरिबांना आरोग्य कवच मिळाले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून करोडो महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस कनेक्शन मिळाले. ५५ कोटी जनधन खाती उघडली जाऊन बँकिंग सेवांचा सर्वसामान्यांपर्यंत विस्तार झाला. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांमुळे गरीब, ग्रामीण आणि शेतकरी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे. मुद्रा योजनेमुळे ५२ कोटींपेक्षा जास्त लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळाले. समाजातील वंचित घटकांना थेट लाभ देऊन २५ कोटींपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले आहे. उडान योजनेच्या माध्यमातून दीड कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला असून, ७४ विमानतळांवरून १६० विमानतळांपर्यंत वाढ झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या १३६ असून, लवकरच ती ४०० पर्यंत पोहोचेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button