breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या पुन्हा ब्लॉक

Mumbai-Pune Expressway : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गावाजवळ गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी उद्या ८ नोव्हेंबर रोजी दुपारी अर्धा तासांसाठी वाहतुक बंद असणार आहे.

मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गावाजवळ गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हेही वाचा – ‘मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध’; काँग्रेस नेत्याचं विधान 

काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.३० वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी ३.०० वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button