TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न बघावेः खासदार रामदास तडस

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेस सुरुवात, अनिकेत मांगडे, पृथ्वीराजची विजयी सलामी

६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक स्पर्धा झाल्या. महाराष्ट्र केसरीची देखिल मैदाने रंगली. पण, कुणी मोठे स्वप्न पाहिले नाही. आम्ही आता हे स्वप्न बघत आहोत. महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले. दीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पै.विलास कथुरे, ऑलंपियन पै. नरसिंग यादव, हिंदकेसरी पै.योगेश दोडके, भारत केसरी पै.विजय गावडे, आशियाई सुवर्ण विजेते पै. रविंद्र पाटील, महाराष्ट्र केसरी बापुसाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस, मुंबई महापौर केसरी आबा काळे, उपमहाराष्ट्र केसरी – रवींद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मल्लांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळावे यासाठी त्यांना अधिकाअधिक सराव मिळून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन देखिल भविष्यात करण्यात येईल. महाराष्ट्रातील मल्लांना डोळ्यासमोर आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसारखे मोठे उद्दिष्ट ठेवल्यास त्याची कामगिरी अधिक चांगली होईल, असेही ते म्हणाले.

Maharashtra, Kesari, Kustis, Aniket Mangde, Prithviraj, Victory Salute,
Maharashtra, Kesari, Kustis, Aniket Mangde, Prithviraj, Victory Salute,

महाराष्ट्र सरकारच्या खेळाडूंना नोकरी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना तडस यांनी या वेळी सरकारने कुस्तीपटूंना नोकरी देताना त्यांच्यासमोर आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याची अट टाका म्हणजे त्यांच्यात जिद्द निर्माण होईल आणि ते अधिक चांगली मेहनत करून प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे करतील, असा विश्वासही तडस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या माती विभागातील पहिल्या लढतीत यजमान पुणे शहरच्या अनिकेत मांगडेने अमरावतीच्या तानाजी झुंजुरकेचे तगडे आव्हान १२-१० असे परतवून लावत शानदार सलामी दिली. डाव आणि प्रतिडावाच्या पहिल्या फेरीनंतर विश्रांतीला सामना ६-६ असा बरोबरीत राहिला होता.

पहिल्या फेरीतील हा वेग दुसऱ्या फेरीत कायम राहिला नाही. चुरस जरूर झाली. पण, बचावावर भर देत दोघांनीही एकमेकांना मैदानाबाहेर काढण्यावरच भर देत गुणांची कमाई केली. या चढाओढीत अनिकेतने बाजी मारली. केसरी गटात पहिल्याच दिवशी गोंदियाच्या वेताळ शेळकेने सोलापूरच्या विशाल बनकरला पुढे चाल दिली. नाव आणि वजन देऊनही वेताळने मातीच्या आखाड्यावर उपस्थिती लावली नाही. अन्य एका लढतीत पृथ्वीराजने आक्रमक आणि वेगवान कुस्ती करताना भारंदाज डावाचा मुक्त वापर करत शुभम जाधवला तांत्रिक आघाडीवर १०-० असे पराभूत केले.

दरम्यान, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत माती विभागातील ५७ किलो वजनी गाटत साताऱ्याच्या ओंकार शिर्केने कमालीची आक्रमकता राखत नंदुरबारच्या निखिल पवारचा तांत्रिक वर्चस्वावर १०-० असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत यवतमाळच्या विनायक चव्हाणने जालनाच्या प्रदिप पवारचे आव्हान ८-७ असे एका गुणाने परतवून लावले.

कोल्हापूरच्या रोहित पाटिलने निर्विवाद वर्चस्व राखताना ज्ञानेश्वर माळीचा १०-० असा पराभव केला. बीडच्या अतिश तोडकरने धाराशिवच्या धवलसिंह चव्हाणला अशाच १०-० अशा फरकाने पराभूत केले. कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने रायगडच्या साहिल शेखचा प्रतिकार १९-१४ असा मोडून काढला. पिंपरी चिंचवडच्या प्रणव सस्तेने अभिजीतचा गुणांवरच १८-८ असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली. याच वजनी गटातून आकाश सरगर आणि सांगलीच्या निनाद बडरे यांनीही आपले आव्हान कायम राखले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button