breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भाजपचे RRR- राणा, राज आणि राणे, छगन भुजबळांची फटकेबाजी

मुंबई : “जो कायद्याचं उल्लंघन करेल त्याविरोधात पोलिस कारवाई करतील. कारण कायद्यासमोर सगळे जण समान आहेत”, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली. तसेच राज ठाकरे, राणा दाम्पत्य आणि राणे पिता पुत्र हे तीन RRR विरोधकांनी चांगलेच जुळवलेले दिसतायत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

राणा दाम्पत्य, राज ठाकरे आणि राणे पिता पुत्रांना छगन भुजबळ यांनी दाक्षिणेचा सुपर डुपर हिट चित्रपट RRR ची उपमा दिली. ठाकरे सरकार उत्तम काम करतंय. लोककल्याणकारी निर्णय घेतंय. पण महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने या तीन RRR चा उपयोग सुरु केलाय, असा टोला त्यांनी लगावला.

इंधन दरवाढ, महागाईविषयी राज ठाकरेंनी बोलायला हवं

“भोंगे सोडून देशात इतरही महत्त्वाचे प्रश्न आहेत. खरंतर इंधन दरवाढ, महागाईविषयी राज ठाकरेंनी बोलायला हवं. पण या मुद्द्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करुन राज ठाकरे नको त्या मुद्द्यावर बोलतायत, कारण त्यांना याच मूळ मुद्द्यावरुन लक्ष हटवायचं आहे, म्हणूनच महाराष्ट्रातील विविध भागांत सभा घेण्याचा त्यांचा खटाटोप सुरु आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

‘राजसाहेब, मनाचा कोतेपणा दाखवू नका, दंगे भडकवू नका’

“ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांवर टीका करण्यासाठी खोटं बोलू नका. उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचं नेतृत्व करत आहेत. राज ठाकरे मनाचा असा कोतेपणा दाखवू नका, महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करू नका, उद्ध्व ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करू नका”, असं आवाहनही भुजबळ यांनी केलं.

“राजसाहेब महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करु नका. उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत आहे. राज्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन खाली खेचण्यासाठी राजसाहेब आपण मनाचा असा कोतेपणा दाखवू नका. उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करु नका”, असं भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button