breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर

मुंबई – अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर १९ मार्च रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक , बालकलाकार समय संजीव तांबे  आणि अश्विनी मुकदाम अभिनीत चित्रपट ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते. शिलादित्‍य बोराद्वारे  निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग , तसेच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केले आहे. भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य १९ मार्चपासून फक्‍त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकतात.

चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ”मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्‍हणजे स्‍वत:लाच प्रश्‍न विचारत समस्‍यांचा सामना करण्‍याच्‍या नवीन पद्धतींचा शोध घेणे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button