breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध! जाणून घ्या कोणासाठी कोणती आश्वासने

BJP Manifesto | लोकसभा निवडणूक २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात १९ आणि २६ एप्रिल, ७, १३, २०. आणि २५ मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात देशातील विविध घटकांच्या विकासावर भर दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी वारंवार म्हणाले आहेत की त्यांच्या मते देशात फक्त चारच जाती आहेत – तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणूक आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘माझ्याविरोधात सर्व एकवटले, त्यांना शरद पवारांना संपवायचंय’; सुप्रिया सुळे यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्पांची पूर्तता करण्याचा रोडमॅप सादर केला आहे.

* रोजगार हमी

* २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन

* ३ कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट

* महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले

* कृषी पायाभूत सुविधा विकसित करणे

* मच्छिमारांसाठी योजना

* ई-श्रमद्वारे कल्याणकारी योजनेचा लाभ

* योगाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करणे

* २०२५ आदिवासी गौरव वर्ष

* ओबीसी-एससी-एसटी प्रत्येक क्षेत्रात आदर

* ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्याची तयारी

* रामायण उत्सव जगभर साजरा केला जाईल

* अयोध्येचा विकास

* वन नेशन, वन इलेक्शन

* रेल्वेतील प्रतीक्षा यादीची समस्या दूर करण्यासाठी

* ईशान्य भारताचा विकास

* एआय, सेमीकंडक्टर आणि स्पेस क्षेत्रात विकसित करणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button