breaking-newsमुंबई

एअर इंडियाच्या मुख्यालयाची विक्री जेएनपीटीला – गडकरी

मुंबई – मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची आयकॉनिक 23 मजली इमारत जेएनपीटीला (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) विकणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या इमारतीची मालकी सरकारकडेच राहावी हा या मागचा हेतू आहे. विक्रीनंतरही इमारत एअर इंडिया या नावानेच ओळखली जाणार असून त्यावरील एअर इंडियाचे चिन्ह तसेच ठेवण्यात येणार आहे.

नागरी विमान वाहतूक आणि नौकानयन मंत्रालये या इमारतीचे मूल्य निश्‍चित करणार आहेत. तुम्ही किंमत निश्‍चित करा, मी जेएनपीटीला ती खरेदी करण्यास सांगतो, असे गडकरी यांनी सांगितले. पीटीआय कर्मचारी संघटना फेडरेशनच्या बैठकीत गडकरी बोलत होते.

नरिमन पॉइंटवरील ही 23 मजली इमारत फेब्रुवारी 2013 पर्यंत एअर इंडियाचे मुख्यालय होती. इमारतीच्या प्रत्येक मजल्याचे किमान 10,800 चौ. फूट क्षेत्रफळ आहे. नवी मुंबई येथील जेएनपीटी देशाच्या एकूण कंटेनर कार्गो वाहतूकीपैकी 55 टक्के कंटनर्सची कार्गोची वाहतूक करते. जेएनपीटीचा वार्षिक नफा सुमारे 1300 कोटी रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button