breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेराजकारणराष्ट्रिय

भाजपच्या ‘फायटर आमदार’ मुक्ता टिळक यांचं पुण्यात निधन

  • पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
  • गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.
  • आज दुपारी साडे तीन वाजता मुक्ता टिळक यांनी गॅलेक्सी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.

मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवलं. पण त्याचवेळी त्यांनी कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासलं होतं.

मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले होते. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button