breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रियविदर्भ

भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची प्रकृती खालावली, विधिमंडळातून थेट रुग्णालयात दाखल

नागपूर ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुतेंची प्रकृती खालावली असून त्यांना विधिमंडळातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी विधान भवनात बबनराव पाचपुते यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. परंतु हे अधिवेशन सुरू असताना बबनराव पाचपुते यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं आणि तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुते यांच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. बबनराव पाचपुचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते आमदार आहेत. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं नाव होतं. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button