breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणास भाजपचा विरोध, राष्ट्रवादी, शिवसेनेचे समर्थन

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (Pradhikaran) राज्य सरकारने (State Government) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) (PMRDA) विलिनीकरणाचा (Merger) निर्णय घेतला आहे. त्याचा महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी (BJP Corporator) निषेध केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना (Shivsena) नगरसेवकांनी समर्थन केले.

प्राधिकरण विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहरावर लादला आहे. यातून महापालिकेला मिळणारा पन्नास हजार कोटींचा निधी लाटण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. महापालिकेत विलिनीकरणाची मागणीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी निर्णयाचे समर्थन केले. नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या विषयावरील चर्चेत अभिषेक बारणे, अर्चना बारणे, राहुल जाधव, विकास डोळस, संदीप कस्पटे, झामाबाई बारणे, अजित गव्हाणे, मीलन यादव यांनीही सहभाग घेतला.

हे विषय देखील मंजूर

– कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी हिंदुस्थान अॅंटिबायोटिक कंपनीस (एचए) २५ कोटी रुपये मदत करणे, पीएमपीच्या हिंजवडी ई-बस चार्जिंग स्टेशनसाठी ९८ लाख रुपये देणे, भोसरी नवीन रुग्णालयासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ८० लाख रुपये, प्रभाग अठरामधील स्मशानभूमीत विद्युत विषयक काम करणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button