breaking-newsआंतरराष्टीय

फ्रान्समध्ये सापडला १४० दशलक्ष वर्षांपूर्वीचा डायनासॉरच्या अस्तित्वाचा पुरावा

पृथ्वीवर एकेकाळी डायनासोरचे अस्तित्व असल्याचा एक महत्वाचा पुरावा फ्रान्समधील पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडला आहे. तब्बल १४० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या शाकाहारी डायनासोरच्या मांडीचे भले मोठे हाड संशोधकांना सापडले आहे. नैऋत्य फ्रान्समधील विंगग्रोविंग या गावातील उत्खननामध्ये हे हाड मिळाले आहे. हा अतिप्राचीन ऐतिहासिक ठेवा असल्याने फ्रान्स सरकारसाठी तो ‘राष्ट्रीय ठेवा’ ठरला आहे.

संशोधकांना सापडलेल्या डायनासोरच्या दोन मीटर लांबीच्या या मांडीच्या हाडाचे वजन तब्बल ४०० किलो ग्रॅम आहे. यावरुन हा डायनासोर किती विशाल असेल याचा अंदाज येतो. जगात आजवर डायनासोरवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी घेतलेला हा ताजा शोध आहे. फ्रान्सच्या बोरडक्स जवळील अँजिक-कॅरन्ट पॅलान्टालॉजिकल साईटजवळ हे हाड आढळून आले आहे. या भागात पुरातत्व शास्त्रज्ञ आणि स्वयंसेवकांनी जमिनीत खोदकाम करुन गेल्या दशकात अशा प्रकारची हजारो छोटी-मोठी डानासोरची हाडं शोधली आहेत.

२२० लोक याविषयी बोलत आहेत

ताज्या शोधामध्ये मिळालेले हाड हे कुठेही तुटलेले नाही, ते संपूर्ण असल्याने यावर संशोधन करताना मोठी मदत होणार आहे. आजवर मिळालेली हाडं ही तुकड्यांच्या स्वरुपात आणि पूर्ण साखळी नसलेली होती. त्यामुळे हा शोध आमच्यासाठी महत्वाचा आहे असे पुरातत्व शास्त्रज्ञ फेमूर यांनी म्हटले आहे. सुरुवातीला आम्ही हे हाड पाहून आश्चर्यचकीत झालो होतो. या क्षेत्रात संशोधन करीत असलेल्या नव्या संशोधकांसाठीही ही महत्वाची बाब ठरल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या डायनासोरचे हाड आम्हाला सापडले आहे ते पृथ्वीवरील सर्वात अवाढव्य डायनासोर होते. त्यामुळे ते आपल्या १८ मीटर लांबीच्या मानेच्या आणि शेपटीच्या मदतीने प्रचंड प्रमाणावर झाडांचा पालाही खात असतील. या शोध कार्यासाठी मला काही प्रमाणावर पैसाही खर्च करावा लागला आहे. कारण मी डायनासोरच्या संदर्भातील महत्वाचे संशोधन करण्याचा प्रणच केला होता आणि आता हा प्रण पूर्ण झाला आहे, असे पुरातत्व शास्त्रज्ञ जिन फ्रान्कॉइस टुर्नेपिचे यांनी म्हटले आहे.

ज्या दलदलीच्या जागेत डायनासोरचे हे हाड सापडले आहे ती जागा युरोपातील सर्वात मोठी डायनासोर साईट म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी पूर्वी एक नदी वाहत होती. त्यामध्ये डायनासोरप्रमाणे अवाढव्य झाडे होती. तसेच उभयचर प्राणी, मगरी आणि मासेही होते. तर पाणी नसलेल्या जागेत छोट्या-मोठ्या डायनासोरचे अस्तित्व होते. या ठिकाणी संपूर्ण जीवन अस्तित्वात होतं असा दावा पुरातत्व शास्त्रज्ञ अॅलन यांनी केला आहे.

या शोधासाठी संबंधीत जागेत दहावे वार्षिक उत्खनन करण्यात आले. त्यासाठी ७५० वर्गमीटर अर्थात ८,१०० वर्ग फूट इतक्या मोठ्या जागेत खोदकाम करण्यात आले आहे. या जागेतून अनेक ऐतिहासिक गुपित खुली व्हावीत यासाठी या जागेच्या मालकाने संशोधकांना आणखी ४००० वर्ग मीटर जागावेर खोदकामासाठी परवानगी दिली आहे. अशा प्रकारे जर आमचे काम सुरु राहिले तर पुढील तीस वर्षे आम्ही या संशोधनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेणार असल्याचे टुर्नेपिचे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button