breaking-newsमनोरंजन

के.एल. राहुलसोबतच्या रिलेशनशिप चर्चांवर अथिया म्हणते…

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचं नातं तसं फार जवळचं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील बऱ्याच जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली- अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग- हेजल कीच या जोड्यांनी लग्नगाठही बांधली आहे. या जोड्या कायमच चर्चेमध्ये असतात. त्यातच आता अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या साऱ्यावर अथिया शेट्टीने मौन सोडलं असून तिची प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसापूर्वी अथियाने के.एल.राहुलसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. फोटोमधील या दोघांची जवळीकता पाहता हे दोघंही प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी या दोघांना काही प्रश्न विचारले. त्यातच दोघांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे तुझ्यावर काही परिणाम होतो का असा प्रश्न अथियाला विचारण्यात आला. त्यावर तिनेही थेटपणे उत्तर दिलं. “मला माझं खासगी आयुष्य सार्वजनिक करायला मला कधीच आवडत नाही. मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. त्यामुळेच मला माध्यमांसमोर काही गोष्टी सांगायला आवडत नाही. त्यामुळे मी आजही याविषयावर काही बोलणार नाही”, असं अथिया म्हणाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button