breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पळपुटेपणा केला, धनजंय मुंडेची पंकजा मुंडेवर टीका

बीड –‘पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर जहरी टीका केली. बीड जिल्हा बँकेची आज आठ जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

‘सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचं ऐकत नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. तसंच 21 तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणापणा केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button