breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील गिरिजा लांडगे हिने स्वातंत्र्यदिनी ‘माउंट किलीमांजारो’ वर फडकवला तिरंगा

– 12 वर्षीय गिरिजाची आणखी एक मोहीम यशस्वी
– पिंपरी-चिंचवडकरांच्या गौरवात मानाचा तुरा
– दिला ”लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा ” हा संदेश

पिंपरी| विशेष प्रतिनिधी

जागतिक पातळीवरील सेव्हन समिट शिखरांपैकी एक असणारे , कुठल्याच पर्वतरांगेचा भाग नसलेले आफ्रिका खंडात असणारे जगातील एकमेव सर्वोच्च ‘माउंट किलीमांजारो’ ( ६८९५ ) हे शिखर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भोसरी येथील १२ वर्षाच्या गिरिजा लांडगेने यशस्वीरित्या सर केले आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला. गिरिजा आईच्या मोहिमेमध्ये आणखी एका यशस्वी चढाईची भर पडली असून या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडकरांचा गौरवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान या शिखरावर पोहोचल्यानंतर गिरिजाने लेक वाचवा लेक जगवा लेक वाढवा हा संदेश दिला.

गिरिजाच्या माउंट किलीमांजारो या मोहिमेची माहिती तिचे वडील धनाजी लांडगे यांनी दिली. ते म्हणाले,
मोहीमेची सुरुवात ११ऑगस्ट पासून झाली. मोहीमे दरम्यान १७०० मीटर – २७०० मीटर – ३७२० मीटर – ४७०० मीटर अशी उंची ४ दिवसात गाठण्यात आली. या चढाई दरम्यान रोज नवीन प्रदेश व नवीन वातावरणाचा सामना करावा लागत होता . पहिल्या दिवशी पावसाळी जंगल आणि पाउस , दुसऱ्या दिवशी मुरलॅंड जो की खडकाळ असा भूभाग व दमट हवामान , तर तिसऱ्या दिवशी वाळवंट सदृश प्रदेश अन भाजणारं उन. या सर्व परिस्थितींशी सामना करत १५ ऑगस्टच्या पहाटे १ वाजता शिखर माथ्याच्या मुख्य चढाईला म्हणजेच ४७०० मीटर वरून ५८९५ मीटर च्या चढाईला सुरुवात करण्यात आली.

चढाई सुरु करण्यादरम्यान गार वारे प्रचंड वेगाने वहात होते , पुर्ण रात्रभर उणे १५° ते २०° असणाऱ्या थंड वातावरणात चढाई चालूच होती .प्रथम गिलमन्स पॉईंट्स नंतर स्टेला पिक अन मग सर्वोच्च असणारा शिखरमाथा उर्हु पिक म्हणजेच माउंट किलीमांजारो सर करण्यास गिरिजाला यश आले . वातावरणाची आक्रमकता व वाहणाऱ्या थंड वाऱ्यांशी सामना करत हे शिखर सर करण्यासाठी साडेआठ तास लागले. १५ ऑगस्टच्या बरोबर सकाळी ९.३० वाजता गिरिजा शिखर माथा गाठून यशस्वी झाली व तिने माथ्यावर तिरंगा फडकवला.

गिरिजा निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रिडाकुल विभागात सातवीमध्ये शिकते.गिरीजाने आत्तापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ६५ किल्ल्यांवर भटकंती केली आहे.तिच्या लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यंगेस्ट माउंटेनिअर म्हणून नोंद झालेली आहे.

नावावर नोंद रेकॉर्डची

२६ जुलै रोजी रशियामधील माउंट एलब्रुस १२ व्या वर्षात सर करणारी गिरिजा जगातली पहिली मुलगी ठरलेली असतानाच आता परत या वयात माउंट किलीमांजारो सर करणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे.तसेच सेव्हन समिटपैकी माउंट एल्ब्रुस आणि माउंट किलीमांजारो ही दोन्ही शिखरे अवघ्या २० दिवसामध्ये यशस्वीरित्या सर करणारी गिरिजा लांडगे ही जगातली पहिली मुलगी ठरली आहे. असा दावा धनाजी लांडगे यांनी केला आहे.

माउंट एल्ब्रुसपेक्षा खूप वेगळा अनुभव या मोहीमेच्या चढाईदरम्यान आला. प्रत्येक पर्वत हा दुसऱ्या पर्वतासारखा असूच शकत नाही , एकाची दुसऱ्या पर्वताबरोबर तुलना होउच शकत नाही. ही कामगिरी माझे आजोबा व सर्व मुलींना मी समर्पित करते

-गिरिजा लांडगे
——

एल्ब्रुस प्रमाणे हे शिखर गिरिजा गाठेल असा विश्वास होता पण हा विश्वास पूर्ण करण्यासाठी गिरिजाने खूप मोठ्या अन कठीण परिस्थितींचा सामना करत तिच्या ईच्छा शक्तीचे, आत्मशक्तिचे दर्शन घडवत होणाऱ्या शारीरिक त्रासाला न जुमानत मानसिक बळावर हे शिखर सर केले , गिरिजाचा बाप म्हणून मला तिचा खूप अभिमान आहे.

-धनाजी लांडगे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4160335740749981&id=100003207893692

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button