breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मला गोळी मारली जाईल’; छगन भुजबळांचा गंभीर आरोप

नागपूर : मराठा आरक्षणावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी सुरू आहे. मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपावर मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मला गोळी मारली जाईल, असा गंभीर आरोपही केला आहे.

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सभागृहात भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवर टीकाही केली. तसंच, त्यांनी काही वृत्तांची कात्रणे सभागृहासमोर ठेवले. यात, आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, मी त्याचा कार्यक्रमच करतो, आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ, ही मनोज जरांगे पाटलांची वृत्तपत्रात छापून आलेली वक्तव्ये त्यांनी सभागृहात वाचून दाखवले.

हेही वाचा  –  ‘तानाशाही नही चलेगी..मणिपूरबाबत न्याय द्या..’; संसदेतील घटनेनंतर महिलेची जोरदार घोषणाबाजी!

सकाळी उठलो आणि पाहिलं की सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा का वाढवली याची चौकशी केली तेव्हा पोलीस म्हणाले की वरून इनपूट आलेलं आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल. पोलिसांचा अहवाल आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

हरकत नाही. मी मरायला तयार आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. आज छगन भुजबळ आहे, प्रकाश सोळंके झाला. उद्या मी असेन. आपण त्यावर गप्प बसणार का? कोणी त्याचा निषेध करणार नाही? कोणी बघायला जाणार नाही? आज महाराष्ट्रसमोर हाच माझा प्रश्न आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button