breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरव येथील प्राथमिक शाळा क्र. 54 ची स्मार्ट शाळा म्हणून निवड

  • मनपाच्या पिंपळे गुरव शाळेचा कौतुकास्पद उपक्रम
  • ‘पिसा’ स्तरावरील विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महापालिका शाळांमधील पिंपळे गुरव येथील प्राथमिक शाळा क्र. 54 ची महापालिका राबवित असलेल्या पायलट प्रोजेक्टमधील स्मार्ट शाळा म्हणून निवड झाली आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांची ई – लर्निंग सुविधेतून तंत्रज्ञानाशी मैत्री तर झालीच आहे. मात्र, याबरोबरच पाच परराष्ट्रीय आणि परराज्यातील भाषा धडेही गिरविले जात आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाशी मैत्री होवून भविष्यात शास्रज्ञ, वैज्ञानिक नासा, इस्रो यांसारख्या नामांकित क्षेत्रात आवड निर्माण व्हावी व भावी काळातील जबाबदार नागरिक बनून जागतिक पातळीवर आपली दाखल घेतली जावी यासाठी पिंपळे गुरव शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून वाबळेवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसारखे ‘पिसा’(आतंरराष्ट्रीय स्तरावरील) विद्यार्थी घडवून शाळेची आतंरराष्ट्रीय दर्जाकडे वाटचाल व्हावी, हा शाळेतील शिक्षकांचा प्रयत्न आहे.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून फक्त मार्गदर्शन केले जाते. महापालिका शाळांच्या तुलनेत अशक्य अशा अनेक प्रोजेक्टवर विद्यार्थी स्वयंप्रेरणेने काम करत आहेत. यामध्ये शिक्षकांनी ‘सुपर 30’ नावाचा एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला आहे. या 30 विद्यार्थ्यांच्या गटात एक प्रगत आणि दुसरा अप्रगत अशा दोन मुलांच्या जोड्या तयार केल्या आहेत. जोडीतील प्रगत विद्यार्थी अप्रगत विद्यार्थ्यांला विषय समजण्यासाठी मदत करणार आणि अप्रगत विद्यार्थी त्याच्यातील कौशल्य प्रगत विद्यार्थ्याला शिकविणार.

या पद्धतीचा परिणाम असा दिसला की शिक्षकांपेक्षाही विषय मित्राकडून मुले जास्त वेगात आणि चांगले शिकू लागली आहेत. मुले देखील तंत्रज्ञानाचा अफलातून उपयोग करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा वेळेआधी पूर्ण होत आहे. ‘पिसा’स्तरावरील विद्यार्थ्यांना फक्त तंत्रज्ञान शिकून उपयोग नाही. त्यांना भविष्यात संशोधक शास्त्रज्ञ, उद्योगी असे वेगवेगळे व्यवसाय क्षेत्र निवडायचे आहेत. तसेच, डिजिटल युगामध्ये सर्व कामे मशीनने होत असल्यामुळे मनुष्यबळ भविष्यात कमी होत जाणार आहे. यासाठी आतापासूनच आपल्या ज्ञानाचा उपयोग परदेशात करायचा झाल्यास तेथील भाषा आत्तापासूनच अवगत व्हायला हवी, यासाठी शाळेत फ्रेंच, जर्मन, चीनी, जपानी, स्पॅनीश आणि अरबी भाषेचे धडे दिले जात आहेत. हे धडे देण्यासाठी कोणत्याही भाषेतील प्रशिक्षक नेमण्यात आले नाही. विद्यार्थी स्वत: यु ट्युब व गुगल अ‍ॅपच्या मदतीने स्वत: भाष शिकत आहेत.

तसेच कन्नड, तेलगू, तमिळ, गुजरात अशा प्रादेशिक भाषाही शिकत आहेत. मुलांना स्वतःचा अभ्यास स्वतः पूर्ण करायची सवय लागली आहे. विद्यार्थी एखाद्या माहितीसाठी गुगलवर सर्च करून सहज माहिती मिळवितात. शाळेला भेट देणार्‍या पाहुण्यांचे स्वागतही विद्यार्थी विविध परराष्ट्रीय  भाषेतून करतात. तसेच, काही विद्यार्थी इंग्रजीतून विज्ञान आणि गणितही शिकवितात. शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी 250 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

वाबळेवाडीच्या शाळेची प्रेरणा घेवून महापालिकेची शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे. यासाठी माझ्या सर्व शिक्षक सहकार्‍यांचा प्रयत्न आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा (पिसा) आंतराष्ट्रीय दर्जाचा झाला पाहिजे. म्हणून आम्ही मुबंईतील आयआयटी पवईशी संपर्क केला आहे. या मुलांना परदेशातही संधी मिळावी म्हणून परराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकत आहे. शाळेतील 32 वर्गात 65 इंची एलईडी टीव्ही देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी स्वत: प्रोग्राम सर्च करुन शिकतात.

संतोष वाघमारे (शिक्षक)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button