breaking-newsराजकारणराष्ट्रिय

‘सगळ्याच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करा’, कर्नाटकात भाजपा नेत्याचा संताप

बंगळुरू | महाईन्यूज

कर्नाटक सरकारमध्येही मंत्रीपदाच्या वाटपावरुन राजी-नाराजीचे सूर उमटत आहेत. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांच्या नेृतत्वात भाजपाने सरकार स्थापन केले आहे. एचडी कुमारस्वामी हे बहुमताचा आकडा पार न करू शकल्याने भाजपाने सत्तास्थापनेचा दावा करत सरकर स्थापन केले आहे. त्यानंतर, झालेल्या मंत्रिपदाच्या वाटपावरुन कर्नाटकात नाराजी नाट्य चांगलंच रंगलेल आहे.

कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ता मधुसूदन यांनी मंत्रिपदाच्या नाट्यावर भाष्य करताना, सर्वच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. मधुसूदन यांची ही मागणी म्हणजे पक्ष नेतृत्वावर उपहासात्मक टीका आहे. मुख्यमंत्री फक्त एकच असायला हवा, पण इतर सर्वच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करा, कारण सगळ्याच मंत्र्यांची उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लॉबिंग सुरू आहे, असे मधुसुदन यांनी म्हटलेले आहे. ग्रामविकासमंत्री के.एस ईश्वरप्पा आणि इतर मंत्रीही उपमुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करत आहेत. उपमुख्यमंत्री पद हे चेष्टेचा विषय बनलाय, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button