ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेच्या शहर सचिवाचा मोठा निर्णय

परभणी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवावे अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असे वक्तव्य केले आहे. यामुळे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे पडसाद परभणीच्या गंगाखेडमध्ये उमटले आहेत. मनसेचे शहर सचिव महेमूद शेख यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरावेत अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असे वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्याचे राजकारण तापले आहे. पण राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे परभणीच्या गंगाखेड येथील मनसेचे एकमेव मुस्लिम पदाधिकारी शहर सचिव महेमूद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शेख यांनी राजीनाम्यासोबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये राज ठाकरे यांचे विचार आणि महाराष्ट्राला नवनिर्माण करण्याची संकल्पना आपल्याला खूप आवडते. यामुळे शिवसेनेत होतो तेंव्हापासून मी राज साहेबांचा समर्थक होतो. मनसेची स्थापना केली तेंव्हा आपल्या स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे मनसे स्थापनेपासून एक सच्चा मनसैनिक म्हणून मी काम केले. गावामध्ये पक्षाची शाखा स्थापन करण्यापासून शाखाध्यक्ष ते शहर सचिव या पदापर्यंत काम केले, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

गावात सामाजिक, धार्मिक कार्यक्रम राबविले. आणि कार्यकर्ते वाढविले. यात मोठी अडवणूक होती ती माझी जात, समाजातील नागरीक, माझे नातेवाईक मला शिव्या द्यायचे. तू एका हिंदू नेत्याच्या पक्षात काम करतोस, तुझा नेता मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलतो, तुला कळत नाही, मी त्यांना समजावून सांगायचो, की माझे साहेब कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीत, ते फक्त महाराष्ट्र धर्म मानतात, त्यांचे विचार राज्याला नवनिर्माण करण्याचे आहेत, असे शेख महेमुद यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button