ताज्या घडामोडीमुंबई

#IPSTransfer: गृह विभागाचे मोठे पाऊल; एकाचवेळी ‘या’ ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पुण्याचे सहआयुक्त बनले असून चर्चेत असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करून जयंत नाईकनवरे यांना नाशिकच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली आहे.

कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच पदोन्नती असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाच्या वतीने बुधवारी जारी करण्यात आले. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) येथे बदली करण्यात आली आहे. सुहास वारके हे नवे सहआयुक्त असतील. बदली करण्यात आलेल्या इतर विशेष पोलीस महानिरीक्षकांमध्ये दीपक पांडे (महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग), सुरेश कुमार मेकला (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग), रवींद्र शिसवे (राज्य मानवी हक्क आयोग) यांचा समावेश आहे. उपमहानिरीक्षक पदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देऊन बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये लखमी गौतम (आस्थापना, महाराष्ट्र पोलीस), सत्यनारायण (सागरी सुरक्षा), एस. जयकुमार (प्रशासन, महाराष्ट्र पोलीस), निशित मिश्रा ( दहशतवाद विरोधी पथक), सुनील फुलारी (मोटार परिवहन विभाग), संजय मोहिते (कोकण परिक्षेत्र), सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग), दत्तात्रय कराळे (सहआयुक्त, ठाणे शहर), प्रवीण पवार (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी), बी. जी. शेखर (नाशिक परिक्षेत्र), संजय बाविस्कर (पुणे गुन्हे अन्वेषण विभाग), वीरेंद्र मिश्रा (उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई) यांचा समावेश आहे.

उपमहानिरीक्षक पदावर बढती देऊन बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये परमजीत सिंह दहिया (एटीएस), निवा जैन (नागपूर शहर), राजेंद्र माने (अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर), विनायक देशमुख (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई), महेश पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस), संजय जाधव ( अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर), दीपक साकोरे (राज्य राखीव पोलीस बल, पुणे), पंजाबराव उगले (सशस्त्र पोलीस), श्रीकांत पाठक (मीरा भाईंदर वसई विरार), विजय पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), दत्तात्रय शिंदे ( संरक्षण आणि सुरक्षा, मुंबई) यांचा समावेश आहे. अधीक्षक दर्जाच्या अक्षय शिंदे, अतुल कुलकर्णी, मनीष कलवानिया, निमित गोयल, राजा रामासामी, लता फड या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button