कातवी गावात डांबरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पुणे | कातवी गावात नगरपंचायतच्या माध्यमातून, नगरसेवक तथा गटनेते दिनेश गोविंदराव ढोरे यांच्या विशेष प्रयत्नातून व आमदार सुनील शेळके यांच्या आमदार निधीतून अशोक घुले ते विजय राऊत ते अंकुश चव्हाण (घुले वस्ती) यांच्या घरापर्यंत करण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कामाचे शनिवारी (दि.20) भूमीपूजन करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी 27 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे.‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ प्रभाग क्रमांक 2 शनिवारी कातवी गावामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून व नगरसेवक दिनेश गोविंदराव ढोरे यांच्या विशेष प्रयत्नातून 27 लाख रूपये निधी वापरण्यात येणा-या घुले वस्तीवरील डांबरीकरण रस्त्याचे भूमीपुजन करण्यात आले आहे.यावेळी जगन घुले, विजय राऊत, अंकुश चव्हाण, अनंता घुले, बाळु घुले, संभाजी घुले, पंढरीनाथ घुले, श्रीकांत चांदेकर, विनायक दांडेकर, प्रेम कर्नावट, श्रीकांत पाटील, कुलदीप ढोरे,प्रसाद ढोरे, शैला शिंदे, जयश्री चव्हाण, निर्मला घुले, दिपाली घुले.समस्त कातवी ग्रामस्थ घुले वस्ती उपस्थित होते.
खुप दिवसांच्या प्रतिक्षेत असलेल्या रस्त्याच्या अडचणीचा विषय मार्गी लावल्याबद्दल कातवी ग्रामस्थांनी नगरसेवक दिनेश ढोरे यांचे आभार मानले आहेत.