ताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादी करणार 10 हजार चष्म्यांचे वाटप

पुणे | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 10 हजार चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शरदचंद्र पवार सहस्त्रचंद्र दर्शन दृष्टी महोत्सव ते शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत या चष्म्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी दिली.देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दृष्टी महोत्सवानिमित्त आयोजक पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या वतीने संपुर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जेष्ठ नागरीकांसाठी मोफत 10 हजार चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित केला असून या उपक्रमांतर्गत शनिवार (दि 20) मावळ तालुक्यातील शिवली येथे मोफत नेञ तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.शिवली येथे नागरीकांचा मोठा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. यावेळी जेष्ठ नागरीक भावनिक झाले व घोटकुले यांच्या या उपक्रमाला आशिर्वाद दिला.यावेळी नागरीकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व सचिन घोटकुले यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button