पिंपरी / चिंचवड

‘मुलाला समजावून सांग’ म्हणत महिलेला हांड्याने मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

‘तुझ्या मुलाला समजावून सांग’ असे म्हणत महिलेला हांड्याने मारहाण केली. तसेच तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना देहूगाव येथेे शनिवारी (दि, 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी आशा महादेव जाधव (वय 32, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैशाली मांडवे, निर्मला गायकवाड, तात्याराम मांडवे, (सर्व रा. देहूगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा रस्त्यावर खेळत होता. त्यावेळी आरोपी वैशाली मांडवे फिर्यादीच्या पतीला म्हणाली की, ‘तुझ्या मुलाला समजावून सांग’. त्यानंतर आरोपी वैशाली हिने फिर्यादी यांना हांड्याने मारहाण करून दुखापत केली. तसेच तात्याराम मांडवे व निर्मला गायकवाड यांनी फिर्यादी यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून धमकी दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button