breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवीत ‘एमएनजीएल’ गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत चार मोटारी जळून खाक

पिंपरी |महाईन्यूज|

खोदाई सुरु असताना एमएनजीएल पाईपलाईनमधून गॅस लिकेज झाल्याने आग लागली. या आगीत रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारी जळाल्या. ही घटना नवी सांगवीतील मयूरनगरी येथे घडली.

मयूरनगरी येथील रस्त्यावर मंगळवारी (दि. ११) दुपारी दोनच्या सुमारास खोदाई सुरु होती. त्यावेळी एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली. त्यातून गॅस बाहेर पडला गॅसने पेट घेतला. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारींना आग लागली. काही क्षणातच आग पसरल्याने मोटारींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रहिवासी भागात ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राच्या दोन व रहाटणी उपकेंद्राची एक अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button