breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : मायबाप…आम्ही मदत नाही…कर्तव्य बजावतोय : आमदार सुनील शेळके (व्हीडिओ)

– मावळातील २० हजार कुटुंबांच्या जपण्यासाठी विधायक उपक्रम

– किमान महिनाभर पुरेल इतके रेशन वाटपासाठी तालुक्यात नियोजन

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोलमजुरी करणाऱ्या आणि कष्टकरी कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील एकाही व्यक्तीला उपाशी झोपू देणार नाही. असा आमचा संकल्प आहे. मात्र, मायबाप…आम्ही तुम्हाला मदत करीत नाही. तर, आमचे कर्तव्य बजावत आहोत, अशा भावना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.

                      ‘संवेदशनशील मनाचा नेता’ अशी प्रतिमा पुणे जिल्ह्यात निर्माण केलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील तब्बल २० हजार गरजु कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तु पुरवण्याचा संकल्प केला आहे. किमान महिनाभर पुरेल इतक्या वस्तुंचा संच नागरिकांना देण्यात येत आहे. देहुरोड कॅन्टोन्मेंट परिसरात या उपक्रमांतर्गत धान्य व रेशन वाटप करण्यात आले. यावेळी कँन्टोन्मेंट प्रशासन, पोलीस, दानशूर नागरिक यांचेही आ. शेळके यांनी आभार मानले.

                      कोरोनामुळे अनेकांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. समाजातील स्वयंसेवी संस्था, राजकीय व्यक्ती पुढाकार घेवून मदत करीत आहेत. त्याच उपक्रमांची प्रसारमाध्यमांमध्ये माहिती देवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मदत घेणारे नागरिक अडचणीत आहेत…त्यांना रोजगार किंवा काम मिळत नाही…म्हणून मदत घेताना दिसतात. त्यामुळे आम्ही मदत करीत आहोत, असा आविर्भाव मुळीच नाही. आम्ही अडचणीत असलेल्या  नागरिकांप्रति आमचे कर्तव्य बाजावत आहोत, असेही आ. शेळके यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button