पिंपरी / चिंचवड

पोलीस महिलेची वाट अडवली, दोन दिवसांनी पोलीस ठाण्यातील वाहने पेटवली

पिंपरी l प्रतिनिधी

एका तरुणाने पोलीस महिलेची पोलीस ठाण्यातच वाट अडवली. त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लावून त्यांचे नुकसान केले. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली पोलीस ठाण्यात घडली.

निखिल दत्तात्रय कंगणे (वय 22) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई रेखा गायकवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल हा फिरस्ती आहे. 31 जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास त्याने फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांची वाट अडवली. त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

2 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास निखिल याने फिर्यादी महिला पोलीस आणि पोलिसांनी जप्त करून ठेवलेल्या तीन दुचाकींना आग लावली. यात चारही दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच इतर वाहनांचे कुशन फाडून नुकसान केले. पार्किंगमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पोलीस ठाण्याच्या खिडक्यांवर दगड मारून काचा फोडल्या. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button