पिंपरी / चिंचवड

तलवारीचा धाक दाखवत रोकड लुटली; दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी भंगारच्या दुकानात जाऊन तलवारीच्या धाकाने दुकानातून पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री सव्वानऊ वाजता वेताळनगर, चिंचवड येथे घडली.

तेजस उर्फ भैय्या नितीन वायदंडे (वय 19, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), दिनेश महादेव इंगळे (वय 21, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शकील सलीम शेख (वय 24, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींचे रविवारी दुपारी भांडण झाले होते. फिर्यादी यांचे वेताळनगर मध्ये न्यु इंडिया स्क्रॅप सेंटर हे भंगार दुकान आहे. दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपी रविवारी रात्री फिर्यादी यांच्या दुकानात आले. तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानातील गल्ल्यातून पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button