breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘इंद्रायणी थडी’  महोत्सवाच्या भेटीला!

महिला सक्षमीकरण उपक्रमाला मिळाले प्रोत्साहन

भोसरीतील दिमाखदार महोत्सवाचा आज समारोप

पिंपरी । प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील सर्वात मोठी असा लौकीक प्राप्त ‘इंद्रायणी थडी- २०२३’ मध्ये  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. यासाठी शिंदे पिंपरी-चिंचवडचा दौरा करणार असून, महिला सक्षमीकरण चळवळीला बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री महिलांसाठी काय घोषणा करणार? याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे. 

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने गावजत्रा मैदानावर तब्बल १७ एकर जागेत भव्य इंद्रायणी थडी भरवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रभरातील तब्बल १ हजार महिला बचतगटांना स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे महिला बचतगटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले होते. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चार दिवसांत महोत्सवाला भेट दिली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. लाखो लोकांची या महोत्सवाला गर्दी झाली असून, तीन दिवसांत साडेतीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी थडीला भेट देणार आहेत. महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यामुळे तुफान गर्दी होणार आहे. त्यामुळे हा महोत्सव गर्दीचे उच्चांक मोडणार, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. 

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘इंद्रायणी थडी-२०२३’ च्या समारोप समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी दुपारी ३ वाजता उपस्थित राहणार आहेत. इंद्रायणी थडी सारख्या महिला सक्षमीकरणाच्या सामाजिक उपक्रम  महाराष्ट्रात रोल मॉडेल म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमुळे बचतगटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांना नवीन उर्जा, प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की. आपल्याला आग्रहपूर्ण विनंती की आपण या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button