पिंपरी / चिंचवड

बँक खात्याची गोपनीय माहिती घेत ज्येष्ठ नागरिकाला घातला सव्वादोन लाखांचा गंडा

पिंपरी l प्रतिनिधी

एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे मेसेज पाठवून त्याद्वारे गोपनीय माहिती घेत ज्येष्ठ नागरिकाची 2 लाख 24 हजारांची फसवणूक केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.

गिरीवलकुमार रघुनाथ प्रसाद सोडानी (वय 67, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8100699292 आणि 7604079146 या मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 7604079146 या क्रमांकावरून एक मेसेज आला. त्यामध्ये फिर्यादी यांचे एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार आहे, ते पॅन कार्ड नंबरने अपडेट करून घ्या, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी त्या मेसेज मधील लिंकवर क्लिक केली आणि पूर्ण माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गोपनीय माहिती घेण्यात आली. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यांमध्ये एकूण दोन लाख 24 हजार 799 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button