breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

बँकेच्या भरती परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार?

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 12 बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरतीच्या परीक्षा आता मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमधून होण्याची शक्यता आहे. 12 सरकारी बँकांच्या भरतीबाबत प्रारंभिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केल्या जाव्यात, अशी शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे.

सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक श्रेणीसाठी परीक्षा आयोजित करण्याप्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून एका समितीने ही शिफारस केली. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून सुरू करण्यात आलेल्या परीक्षा आयोजित करण्याची विद्यमान प्रक्रिया समितीच्या शिफारसी उपलब्ध होईपर्यंत रोखून ठेवण्यात आल्या होत्या. समितीने हा निर्णय स्थानिक तरुणाला रोजगाराची एक समान संधी प्रदान करणे आणि स्थानिक-प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून ग्राहकांसोबत अधिकाधिक जुळण्याच्या उद्देशाने घेतला आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यात कम्युनिकेशन गॅपची शक्यता कमी होणार आहे.

भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बड़ौदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, इंडियन ओवरसीज बॅंक, पंजाब एंड सिंध बॅंक, पंजाब नॅशनल बैंक, यूको बॅंक यामध्ये लिपिक पदासाठी भरती परीक्षा होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button